माझ्याबद्दल

विकासकामांचे शिल्पकार कार्यसम्राट, आदर्श नगरसेवक व शिवसेना पक्षनेते श्री.अशोक हरणावळ.

आमचे ध्येय

अशोकभाऊंचा जन्म हा एका सर्वसामान्य घरात झाला, त्यांनी जीवनाच्या वाटेवर असलेले काटे-कुटे तुडवीत आणि दुःख सहन करित संघर्षामय वाटचाल केलीय. त्यातूनच त्यांना अन्यायाविरुध्द लढण्याची जिद्द, धाडस, धैर्य, साहस आणि चिकाटी मिळाली. समाजसेवा, नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि अडी-अडचणी सोडविण्याचं आवड त्यांना लहानपणीच होती. जेव्हा, त्यांना कळायला लागलं तेव्हा त्यांनी हिंदुह्रद्यसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेचा भगवा हातात घेतला. अन शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा मावळा म्हणून राजकीय प्रवास सुरु केला. शिवसैनिक ते उपविभागप्रमूख, आदर्श आणि कल्पक नगरसेवक ते शिवसेनेचा गटनेता अशी त्यांनी भरारी घेतली. मग, अशोकजी आपण कधी मागे वळून पाहिलचं नाही. नगरसेवक झाल्यावर भाऊ आपण आपल्या प्रभागालाच घर मानून काम करायला सुरुवात केली. तूम्ही गेल्या दहा वर्षापासून केलेल्या मेहनतीचं फळ आज आम्हा सर्वांसमोर आहे. आपण केलेला विकास कोणाला सांगायला लागत नाही. तो सहज दिसतोय.

automotive नागरिक हो, तूम्हाला आठवत असेल, शहरातील अनेक नागरिकांना असं वाटायचं की, पर्वतीदर्शन म्हणजे ही एक झोपडपट्टी आहे. होय, तसं वाटण्याचं कारण ही तसंचं होतं. पर्वतीदर्शन परिसराचा विकास इतर भागाच्या तुलनेत म्हणावा तितकासा झाला नव्हता. शिवाय, तसं कोणी आपल्या परिसराकडे लक्ष ही दिलं नव्हतं. विकास, डेव्हलपमेंट, समाजकल्याण व आधुनिक मूलभूत सुविधा यासारखे शब्दचं आपल्याला माहित नव्हते. त्यामूळे आपण विकासापासून कोसे दुर होतो. मात्र, काळ बदलला, वेळ बदलली, आपण आपला नगरसेवक बदला...म्हणून आज परिसर बदलला. आज बाहेरचा कोणी ही व्यक्ती आपल्या परिसरात आला तर येथील घरे, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, निटनिटकेपणा, आपल्या सर्वांमध्ये असलेला एकोपा आणि जिव्हाळा पाहून चक्कीत झाल्याशिवाय राहत. कारण, गेल्या पन्नास वर्षात पर्वतीदर्शन परिसरात जेवढी विकासकामे झाली नसतील तेवढी विकासकामे फक्त गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात चौफेर झाली आहेत. आपल्या परिसरामध्ये झालेला बदल, परिवर्तन व विकास यापाठीमागे एकच नाव आहे...ते म्हणजे पर्वतीदर्शन परिसराच्या विकासाचे शिल्पकार, आपल्या सर्वांचे लाडके, आदर्श नगरसेवक आणि कार्यक्षम शिवसेना गटनेते मा.श्री. अशोक ऊर्फे सुर्यभान हरणावळ.

scroll up