दोन शब्द...!

दोन शब्द...!

माझा जन्म एका सर्वसामान्य घरात झाला आहे. लहानपणापासून हाताला मिळेल ते काम आनंदाने केलं. कधी कुठलं ही काम करताना मनात लाज बाळगली नाही. शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर निस्सिम निष्ठा ठेवून शिवसैनिक म्हणून वेड्यासारखं काम करित होतो. प्रत्येकाला देव एक संधी देत असतो. तिचं सोनं करायचं आपल्या हातात असते. माझ्या कामाची दखल घेऊन आणि माझ्या सोबतच्या सर्व शिवसैनिकांच्या मदतीनं 2007 साली शिवसेनेतर्फे पुणे महानगरपालिका निवडणूकीत उमेदवारी मिळाली. त्यावेळी मी आपल्या आशिर्वादाने प्रचंड मतांनी विजयी झालो.

स्वारगेट उड्डाणपुल

स्वारगेट उड्डाणपुल

शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक उर्फ विष्णु हरणावळ यांनी स्वारगेट उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने स्वारगेट चौकात उड्डाणपुल मंजुर झाला. त्यातून उड्डाणपुलाची वाहतुक खुली झाली असून वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांची त्यापासून सुटका झाली आहे.

व्हिडिओ

आम्हा शिवसैनिकांच कुलदैवत आणि शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी व व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी जपलेल्या कलेची माहिती भावी पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी माझ्या संकल्पनेतून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालनाची निर्मिती सारसबाग येथे करण्यात आली आहे. या व्यंगचित्रकार कलादालानाने पुणे शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे. या व्यंगचित्रकार कलादालानावर आधारित सुप्रसिध्द निवेदक सुधीरजी गाडगीळ यांच्या आवाजात व साई मिडीया सोल्यूशन निर्मित बनविलेला अतिशय उत्कृष्ठ व्हि़डीओ आपण सर्वांनी जरुर पहावा - आपला नगरसेवक अशोक हरणावळ ( शिवसेना) .

scroll up